
एकीकडे एका अभिनेत्रीच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसलेला असताना आता दुसरीकडे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूची बातमी आहे. 27 वर्षांचा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, ज्याचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव व्ही. हरीश असं आहे. हरीशचे सोशल मीडियावर 13 लाख फॉलोअर्स आहेत.
हरीश गेल्या पाच वर्षांपासून फायनान्स आणि गुंतवणुकीशी संबंधित कंटेट पोस्ट करत होता. मंगळवारी चेन्नईच्या मट्टुकाडु भागातील एका भाड्याच्या विलामध्ये त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात त्याचं ऑनलाइन चॅनेल मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट केल्यामुळे ब्लॉक करण्यात आलं होतं. त्याचं दुसरं सोशल मीडिया अकाउंटही ब्लॉक झालं होतं. त्यानंतर हरीशने नवीन चॅनेल सुरू केलं, पण तेसुद्धा रिपोर्ट करून ब्लॉक करण्यात आले
