बई : मुंबई आणि बंगळुरू या शहरांना जोडणाऱ्या देशातील दुसऱ्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसबाबत एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. या एक्सप्रेसची गेल्या आठवड्यात मुंबईत लोणावळ्यापर्यंत चाचणी घेण्यात आली. आता बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचं समोर येत आहे. बंगळुरूचे खासदार पी.सी. मोहन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्याप याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या ऑक्टोबर महिन्यात ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर , बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांनी ही सुपरफास्ट सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होईल असे सांगत पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री यांचे आभार मानले आहेत. या ट्रेनच्या चाचणी दरम्यान रिकाम्या वंदे भारत स्लीपर रेकने मुंबई-पुणे मार्गावर लोणावळ्यापर्यंत धावून आपले तांत्रिक आणि वेगाचे निकष तपासले आहेत. याआधी ही ट्रेन अंतिम चाचण्यांसाठी बंगळुरू आणि मुंबईत

