रिलायन्स इंडस्ट्रीजच्या Jio Platforms च्या IPO मध्ये अर्ज केल्यानंतर आता गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे ती शेअर अलॉटमेंटची. आपल्याला जिओचे शेअर्स मिळणार की नाही, हे कधी समजणार? अर्ज केलेली रक्कम खात्यात कधी परत येणार? आणि अलॉटमेंट स्टेटस कुठे तपासायचं? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. Jio Platforms चा IPO 21 ऑक्टोबरला खुला झाला असून 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
उपलब्ध IPO वेळापत्रकानुसार, शेअर्सच्या वाटपाची प्रक्रिया 26 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबरला पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होण्याची आणि ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांच्यासाठी रक्कम मोकळी करण्याची प्रक्रिया नियोजित आहे. कंपनीच्या शेअर्सचं BSE आणि NSE वर 28 ऑक्टोबरला लिस्टिंग होण्याचं वेळापत्रक आहे. अंतिम तारखांसाठी अधिकृत अपडेट तपासणं आवश्यक आहे.

